Satara: सेना आमदार निघाले भाजपात? ज्येष्ठ नेते शरद पवारांना केलं 'हे' आवाहन

मी माझ्या भुमिकेवर ठाम असल्याचे आमदार महेश शिंदेंनी नमूद केले.
shivsena mla mahesh shinde denies entering in bjp critices ncp leader sharad pawar
shivsena mla mahesh shinde denies entering in bjp critices ncp leader sharad pawarsaam tv
Published On

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे नेते महेश शिंदे (mahesh shinde) हे शिवसेनेतून (shivsena) बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महेश शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बाेलले जात आहे. या चर्चेस आज खूद्द आमदार महेश शिंदे यांनी पुर्णविराम दिला आहे. (shivsena mla mahesh shinde denies entering in bjp critices ncp leader sharad pawar)

shivsena mla mahesh shinde denies entering in bjp critices ncp leader sharad pawar
Nitesh Rane: नितेश राणेंना संक्रात गाेड; अटकपुर्व जामीन अर्जावर साेमवारी निर्णय

आमदार महेश शिंदे (mahesh shinde) म्हणाले ज्या काही चर्चा सुरु आहेत. त्याला वावड्या म्हणता येईल. मी शिवसेनेचा आमदार आहे आणि सेनेतेच राहणार आहे. मी काेणत्याही पक्षात जाऊ इच्छित नाही. रयत शिक्षण संस्थेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना अध्यक्ष करावे या भुमिकेवर मी ठाम असल्याचे आमदार शिंदेंनी नमूद केले.

आमदार महेश शिंदे म्हणाले स्वामी संस्था आणि रयत शिक्षण संस्था या संस्था राज्यातील माेठ्या शैक्षणिक संस्था आहेत. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण हाेणे हे क्लेशदायक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी ठरवलं तर रयतच्या घटनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना अध्यक्षपद मिळू शकेल. राज्य सरकार रयत शिक्षण संस्थेला (rayat shikshan sanstha) पैसे देत असेल तर आम्ही करीत असलेली मागणी रास्त असल्याचे आमदार शिंदेंनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com