Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या निवडणुकीला अवघे वीस दिवस उरले आहेत. तरीही निवडणुकीच्या कुंभात महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये. एकीकडे मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV

Nashik Lok Sabha Constituency:

नाशिक लोकसभेच्या निवडणुकीला अवघे वीस दिवस उरले आहेत. तरीही निवडणुकीच्या कुंभात महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये. एकीकडे मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तर दुसरीकडे उमेदवारीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटाची जोरदार रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळ यांनी माघार घेऊनही महायुतीला उमेदवार मिळत नाहीये. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करावा, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावलाय.

नाशिकमध्ये महायुतीला उमेदवार मिळेना

महायुतीकडून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळेल, असं मानलं जात होतं. श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या जाहीर सभेत हेमंत गोडसेंची उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या जागेवर दावा केल्यामुळे जागेचा तिढा वाढला. शिवाय भाजपनेही शिंदे गटाला उमेदवार निश्चित करताना चर्चा करण्याची अट ठेवल्यामुळे शिंदेंची कोंडी झाली.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

दरम्यान नाशिकच्या रिंगणात दोन प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून नवा चेहरा दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

नाशकात महायुतीचा नवा चेहरा?

शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे अशी प्रस्थापित नावं पुढे येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

दरम्यान, महायुतीसाठी पोषक असलेला नाशिकचा कल सध्या मविआकडे दिसून येतोय. कारण मविआचा उमेदवार गेल्या 35 दिवसांपासून लोकांमध्ये वावरतोय. आता या सगळ्या परिस्थितीला पुरुन उरणारा उमेदवार निवडताना महायुतीची चांगलीच कसरत होणार, हे मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com