Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Lok Sabha Election 2024 : सांगलीची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीत राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी दिल्लीपर्यंत धडपड केली. मात्र त्याला यश आलं नाही.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

सांगलीची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीत राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी दिल्लीपर्यंत धडपड केली. मात्र त्याला यश आलं नाही.

सांगलीतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात कदम यांनी ठाकरे गटावरील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. लोकसभा सोडली, विधानसभेला आवाज काढायचा नाही, असा दमही दिला होता. मात्र आता विश्वजीत कदम मविआच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या बंडानंतर कदम यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष होतं. मात्र कदम प्रचारात सहभागी झाल्यानं ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे. कदम यांनी चंद्रहार पाटलांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

सांगलीमध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील तिस-यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा तर 2019 मध्ये विशाल पाटील यांचा पराभव केला होता. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी यंदा उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसमध्ये बंड केलं.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

विजयाच्या निर्धारानं विशाल पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आता हुकमी डाव टाकत राजकारण नवखे असलेले चंद्रहार पाटील या दोघांना चितपट करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com