Crime News: मलकापूरात जुगार अड्ड्यावर छापा पाेलिसांचा छापा; ५ अटकेत

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
malkapur crime news
malkapur crime newssaam tv

बुलडाणा (crime news) : मलकापूर शहरातील गजानन टॉकिज आणि मोहनपुरा भागात जुगार अड्ड्यावर छापा मारून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ५ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून १९ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अप्पर पोलीस अधीक्षकांना मलकापूर (malkapur) शहरात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार असे प्रकार चालतात याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पथक स्थापन करुन बुधवारी माेठी कारवाई केली. पथकातील पाेलिस (police) कर्मचारी गजानन बोरसे, गजानन आहेर, रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ, राम धामोडे यांनी मलकापूर येथील गजानन टॉकीज समोर व मोहनपुरा भागात मटका जुगार अड्डयावर छापा मारला.

malkapur crime news
Satara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक

या छाप्यात पाेलिसांनी पाच जणांना पकडले (arrest). त्यांच्या विरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने पाेलिस विभागाने केली.

edited by : siddharth latkar

malkapur crime news
Gadchiroli: कुरेखेडात भाजप, मूलचेरात एनसीपी- सेना, धानाेरात काॅंग्रेसचा फडकला झेंडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com