MAHARASHTRA HEATWAVE AND THUNDERSTORM ALERT; MONSOON EXPECTED BY JUNE 5 AI
महाराष्ट्र

Maharashtra Heatwave : राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : राज्यात उष्णतेची तीव्र लाट आणि काही भागांत वादळी पावसाचा इशारा. मराठवाडा व विदर्भात तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता. हवामान विभागाचा यलो अलर्ट; मान्सून ५ ते ६ जूनदरम्यान महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज.

Alisha Khedekar

  • राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पावसाची दुहेरी स्थिती

  • मराठवाडा-विदर्भात तापमान ४५ अंशांच्या पुढे

  • धाराशिव-लातूरमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट

  • मान्सून ५-६ जूनदरम्यान महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता

Maharashtra Today 18th May Weather Update राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आणि पूर्वमोसमी वादळी पावसाची दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार असून काही ठिकाणी वादळी पावसाचीही शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मान्सून १६ मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असून अद्याप तो जैसे थे आहे. ५ ते ६ जून पर्यंत तो महाराष्ट्रात येण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्याला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि विजेपासून दूर राहावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा उच्चांक नोंदवण्यात आला. अमरावती, वर्धा, अकोला, ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. परभणी येथे ४४ अंश, तर सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, नागपूर आणि वाशीम येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. याउलट, महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान-निकोबार परिसरात प्रवेश केला असून मॉन्सूनच्या पुढील प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांचे परभणीत आगमन

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी व्हेज मंच्यूरियन; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT