चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

China's 'Operation Gold': चीन आपल्याकडील सोन्याचा साठा दिवसेंदिवस वाढतोय... अशातच चीननं ऑपरेशन गोल्ड सुरु केलयं... ऑपरेशन गोल्ड नेमकं काय आहे? चीनच्या या नव्या धोरणाचा सोन्याच्या किंमतीवर काय परिणाम होऊ शकतो...पाहूयात या रिपोर्टमधून...
China's Operation Gold and its impact on global gold prices
China's Operation Gold and its impact on global gold pricessaam tv
Published On

जगभरातील बाजारपेठेत सध्या एकच खळबळ माजलीय... अमेरिकेचा श्वास रोखला गेलाय आणि सर्वांच्या नजरा फक्त एकाच देशावर आहेत..तो देश म्हणजे चीन..कारण चीन सध्या पाण्यासारखा पैसा खर्च करून टना टनाने सोने खरेदी करतोय...ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या 'पीपल्स बँक ऑफ चायना' ने हाँगकाँगमध्ये आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करायला सुरुवात केलीय. जगातील सर्वात मोठ्या सरकारी सोने खरेदीदारांमध्ये चीनचा समावेश होत असून सलग 20 महिन्यांपासून चीन सातत्यानं सोन्याची खरेदी करतोय..

एकीकडे जगभरातील अनेक मध्यवर्ती बँका आपले सोने लंडनमध्ये सुरक्षित ठेवतात, जेणेकरून गरज पडल्यास कमर्शियल बँकांना सोने उधार देऊन बाजारात रोकड कायम राखता येईल. चीननं मात्र लंडनमधील सोन्याचा साठा हाँगकाँगला हलवलाय....यामागचं कारण म्हणजे...

चीन जगातील सोन्याच्या सर्वात मोठा वापरकर्ता आणि आयातदारांपैकी एक आहे

हाँगकाँगला सोन्याचा साठा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोन्याच्या बाजाराची दिशा बदलू शकते

हाँगकाँगमधील नवीन गोल्ड क्लिअरिंग सिस्टमला पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील सोन्याचा साठा हाँगकाँगला हालवण्यात आल्याचीही चर्चा आहे

'गोल्ड प्राईस डिस्कव्हरी'मध्ये हाँगकाँगला मजबूत करणं हा देखील यामागील मुख्य उद्देश आहे

मात्र चीननं सोन्याची खरेदी आणि साठा असाच सुरु ठेवल्यास जगभरात सोन्याचा तुटवडा निर्माण होऊन चीनची सोन्यावर मक्कतेदारी निर्माण होईल..अलीकडच्या काळात भारत आणि सर्बियासारख्या देशांनीही सुरक्षा आणि जागतिक राजकारणामुळे आपल्या देशात सोन्याचा साठा परत मागवलाय..त्यात चीननं हाँगकाँगमध्ये सोन्याचा साठा केल्यास भविष्यात इतर देश आपलं सोने पाश्चात्त्य देशांऐवजी स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवण्यास सुरुवात करतील.. ज्यामुळे लंडनसारख्या पारंपरिक गोल्ड हबचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे...तसचं आशियातील सोन्याच्या व्यापाराचा प्रभाव आणि सोन्याची मागणी वाढून अतिरिक्त साठ्यामुळे चीनला याचा फायदा होईल.... पण चीनची ही रणनीती यशस्वी होऊन बाजारातली ड़ॉलर्सची मक्तेदारीही कमी होणार? की चीनच्या या महत्त्वकांक्षेला अमेरिका वेळीच रोखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com