Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट; दोन दिवसांपासून तापमानात वाढ, अनेक शहरात तापमान चाळीशी पार

Maharashtra Temperature : राज्यात झालेल्या अवकाळी पावसानानंतर उष्णतेची लाट पसरण्यास सुरवात झाली आहे. साधारण आठवडाभर तापमान ३५ अंशापर्यंत खाली राहिले होते. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा होता

Rajesh Sonwane

Maharashtra Weather राज्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात घट झाली होती. यानंतर मात्र तापमानात वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील दोन दिवसांपासुन तापमानात वाढ झाली असून राज्यातील अनेक शहरातील तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. काही शहरातील तापमान तर ४२ अंशाच्या वर पोहचल्याने उष्णतेच्या तीव्र झळा जनविण्यास सुरवात झाली आहे. 

राज्यात झालेल्या अवकाळी पावसानानंतर उष्णतेची लाट पसरण्यास सुरवात झाली आहे. साधारण आठवडाभर तापमान ३५ अंशापर्यंत खाली राहिले होते. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा होता. यानंतर मात्र आता हळूहळू तापमानात वाढ होत असून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रामुख्याने धुळे, जळगाव, यवतमाळ, अकोला, अमरावती या शहरातील तापमान ४० अंशाच्या वर पोचल्याची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता

विदर्भात उष्णतेची लाट 

दरम्यान विदर्भातील तापमान येत्या दोन- तीन दिवसांत ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थितीला सामान्य तापमानापेक्षा विदर्भात तीन अंश सेल्सिअसपर्यंत जास्त तापमान आहे. यामुळे उष्णता वाढली आहे. यातच उद्या आणि परवा विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढले आहे. 

अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

यवतमाळ जिल्ह्यात दोन ते तीन दिवस ढगाळी वातावरणासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तापमानाचा पारा थेट ४२.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक ४३.२ तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे सूर्य जणू आग ओकत आहे की काय? असा भास होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर निघताना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केला आहे.

अमरावतीत यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
अमरावती शहर देखील तापले आहे. अमरावती जिल्ह्यात काल यंदाच्या सर्वाधिक ४२.६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच अमरावती जिल्ह्यासह शहरात उन्हाचे चटके जाणवत आलेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अमरावती जिल्ह्याचा पारा ४२ डिग्रीवर गेला असला तरी ९ व १० एप्रिलला अमरावती जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT