Rain Alert : आजही पावसाचा हाहाकार, विदर्भासह राज्यातील १३ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मुंबईसह १३ जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, नाशिक घाटमाथा, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: IMD ISSUES ORANGE & YELLOW WARNING FOR MUMBAI AND 13 DISTRICTS
MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: IMD ISSUES ORANGE & YELLOW WARNING FOR MUMBAI AND 13 DISTRICTSSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईसह राज्यातील १३ जिल्ह्यांसाठी IMD कडून ऑरेंज आणि येलो अलर्ट

  • रायगड, पुणे आणि नाशिक घाटमाथा भागात अतिजोरदार पावसाची शक्यता

  • कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाचा इशारा

  • विदर्भात गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान आज मुंबई उपनगरासह १३ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी केला करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड जिल्ह्यासह नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: IMD ISSUES ORANGE & YELLOW WARNING FOR MUMBAI AND 13 DISTRICTS
Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

दरम्यान, विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट लागू करण्यात आला असून वादळी वातावरणामुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: IMD ISSUES ORANGE & YELLOW WARNING FOR MUMBAI AND 13 DISTRICTS
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

विदर्भाला पावसाचा तडाखा

गेले २ दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने झोडपून काढले. मागच्या १२ तासांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा लोणी मार्गावरील कुट्टी नदी पुलाजवळ कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला. तर भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. विदर्भात पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com