महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र
अकोल्यात ४५ अंश तापमानाची नोंद
विदर्भात हीटवेव्ह, कोकणात दमट उकाडा
धुळे, लातूर, बुलढाण्यात तापमान वाढ
विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून पालकांचा संताप
राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानाने अक्षरशः विक्रमी पातळी गाठली आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, ही या हंगामातील सर्वाधिक नोंद मानली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ‘हीटवेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारी भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान जाणवणार आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके कपडे वापरणे असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. उष्णतेची लाट अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
पुण्यासह राज्यभर उन्हाचा तडाका वाढला आहे. पुण्यातलं तापमान गेल्या आठवड्याभरापासून ४०°c च्या वर आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकर थंड पेय घेत आहे. सध्या ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतर पेयापेक्षा उसाचा रस जास्त आयुर्वेदिक असतो. एकीकडे ऊन आणि दुसरीकडे उसाच्या रसाचा आनंदही पुणेकर घेताना दिसत आहेत.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतो आहे. दुपारी एक ते चारच्या सुमारास ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी भागात सर्वाधिक म्हणजे ४२ अंश सेल्सिअसवर तापमान गेल आहे. दुपारच्या वेळेला नागरिक अनावश्यक बाहेर येण टाळत आहेत.
धुळ्यात आज ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमान वाढीचा परिणाम नागरिकांवर झाला आहे. वाढत्या उकाड्याने दुपारच्या वेळी नेहमी गजबजणारे रस्ते दिसत आहेत निर्मनुष्य झाले आहेत. धुळ्यात हवामान विभागातर्फे उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे. पुढील काही दिवस तापमान वाढीचा हवामान विभागातर्फे इशारा देण्यात आला.
बुलढाणा शहर हे थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखल्या जात होतं, मात्र आता बुलढाणा हे उष्ण हवेच ठिकाण बनलं आहे. तब्बल 68 वर्षानंतर बुलढाण्याचं तापमान पुन्हा 43 अंश सेल्सिअस इतकं आज नोंद झाल आहे. 43 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झाल्याने दिवसेंदिवस बुलढाणा हे उष्ण हवेचे ठिकाण बनत जात असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र गॅझेटिअरनुसार यापूर्वी 23 मे 1954 व 25 एप्रिल 1958 रोजी 42.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र आज 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.