Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात कुठे कडक ऊन, कुठे गारपीट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे

Shivani Tichkule

Maharashtra Heat Wave: राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केला आहे. 

पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेची लाट

शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील किमान ४ दिवस मुंबईसह (Mumbai) कोकणातील काही जिल्ह्यातील लोकांनी उन्हात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Maharashtra Weather Forecast)

प्रमुख शहरांचे कमाल तापमान

अकोला ४४.०
अमरावती ४३.२
चंद्रपूर ४२.६
अहमदनगर ४२.४
वर्धा ४२.२
परभणी ४२.२
मालेगाव ४१.६
वाशीम ४१.५
गोंदिया ४१.५
नागपूर ४०.९
औरंगाबाद ४०.८
सोलापूर ४०.६
पुणे ४०.१
सातारा ३९.५

या ठिकणी पाऊस, गारपिटीचा अंदाज

पुढील ४८ तासांत विदर्भातील अनेक शहरात मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर सांगली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

शाळांना सुटी

वाढत्या तापमानामुळे शासनाने राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुट्टी जाहीर केली आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तसेच विदर्भातील जून महिन्यातील तापमानाचा विचार करता येथील शाळा ३० जूनपासून सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT