Nagpur Crime News: धक्कादायक! डोक्यात दगड घालून रिक्षा चालकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Crime News Update: नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत ही भीषण घटना घडली आहे.
Nagpur Crime News
Nagpur Crime Newssaam tv

Nagpur Crime News: नागपूर (Nagpur) शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांविरोधात पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत असतानाच शहरात पुन्हा एकदा भीषण हत्येची घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Nagpur Crime News
Raj Thackeray News: 'दादा ज्याचं जळतं त्यालाच कळतं...' सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारत साधला निशाणा

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास गुजरात हॉटेल समोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणाची अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. राजकुमार यादव (वय,३२) असे मृताचे नाव असून तो ऑटो चालक असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

Nagpur Crime News
Talathi Demand Bribe: परभणीत ACBची मोठी कारवाई; 20 हजारांची लाच मागणार्‍या महिला तलाठीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या बाबतचा अधिक तपास सीताबर्डी पोलिस करत आहेत. तरुणाची भीषण हत्या कोणी केली, या हत्येचे कारण नेमके काय याबाबतचे गुढ कायम असून हत्येचा सखोल तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com