Raj Thackeray News: 'दादा ज्याचं जळतं त्यालाच कळतं...' सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारत साधला निशाणा

kharghar heat stroke News: दुर्घटनेवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तो एक अपघात त्याचे राजकारण काय करायचं अशी प्रतिक्रिया दिली होती.
Raj Thackeray Sushma Andhare
Raj Thackeray Sushma AndhareSaamtv
Published On

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Sushma Andhare Writes To Raj Thackeray: सध्या खारघर (Kharghar) दुर्घटनाप्रकरणावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 14 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. ज्यामुळे राज्याचे राजकारणही चांगलेच तापले होते. या दुर्घटनेवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तो एक अपघात त्याचे राजकारण काय करायचं अशी प्रतिक्रिया दिली होती.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्र लिहित थेट निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी ६ प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray Sushma Andhare
kharghar heat stroke News: 'खारघर दुर्घटनेची न्यायालयीन ‌चौकशी करावी...' विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी

याबाबत अधिक माहिती अशी की, खारघर दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेले आहेत. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुन सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना खरमरीत पत्र लिहले आहे.

सुषमा अंधारे यांचे पत्र जशेच्या तसे....

प्रति, श्री. राज ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे. खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले.

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उद्धव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली. आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते.

Raj Thackeray Sushma Andhare
Sanjay Raut Vs Narayan Rane: नारायण राणे अडचणीत; संजय राऊत यांच्याकडून कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल, काय आहे प्रकरण?

मुद्दा क्रमांक एक: कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.

मुद्दा क्रमांक दोन : भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?

मुद्दा क्रमांक तीन : श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

मुद्दा क्रमांक चार : कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खासगी पीएम केअर फंडमध्ये निधी द्या असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांचे कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?

मुद्दा क्रमांक पाच : गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का?

मुद्दा क्रमांक सहा : सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती, वारी बंद होती तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ?

दरम्यान, पत्राच्या शेवटी कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली. या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का? असेही त्या म्हणाल्या आहेत. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com