महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील अवैध धंद्यांच्या वादातून गोळीबार... दिनू गावित
महाराष्ट्र

महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील अवैध धंद्यांच्या वादातून गोळीबार...

नवापुर तालुक्यातील लक्कडकोट या गावामध्ये अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : महाराष्ट्र- गुजरात सीमेवर मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यातून लाकूड, दारू तसेच जुगाराचे अड्डे असल्याने काल रात्री अवैध धंद्याच्या वादातून नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील लक्कडकोट या गावामध्ये अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंधाराचा फायदा घेत केलेल्या गोळीबारात प्रवीण गावित नावाचा युवक जखमी झाला आहे. प्रवीणच्या दिशेने दोन राउंड फायर करण्यात आले होते.

हे देखील पहा-

दोन्ही राउंड मीस फायर झाले असले, तरी एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. हा गोळीबार सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाच्या भानगडीतुन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अवैध धंद्यातून पोलिसांचीही मोठी लागे बंदी असल्याने घटनेची माहिती कळताच नंदुरबार हुन ८० किलोमीटर लांब जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन अहिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नवापूर पोलिसांचा मोठा फौजफाटासह घटनास्थळी धाव घेतला आहे.

या घटनेमुळे रात्रीतून नाकाबंदी करत आरोपीला शोधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्यापही आरोपी हाती लागलेला नाही. गोळीबार करणारे गुजरात राज्यातले असल्याचे सांगितले जात आहे. नवापुर तालुक्यातील लक्कडकोट अवैध धंद्यांचा मोठा अड्डा आहे. या ठिकाणी जुगार, अवैध दारू विक्री, सर्रासपणे सुरू राहते. स्थानिकांनी अनेक वेळा पोलिस प्रशासनाकडे अवैध धंदे बंद करावे.

यासंदर्भात तक्रारी केल्या पोलीस कारवाई देखील करतात. परंतु, पुन्हा अवैध धंदे जैसे थे सुरू राहतात. नवापुर तालुक्यातील लक्कडकोट हे गाव महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी गुजरात राज्यातील मोठे शौकीन येत असतात. यातून अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

Mumbai Tourism : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

Maharashtra News Live Update: माळीण मार्गावरील वाहतूक ठप्प, पांचाळे गावाजवळ झाड कोसळले

SCROLL FOR NEXT