Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: बोगस लाडकींचा सुळसुळाट; 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक गैरप्रकार

Ladki Bahin Yojana: जिल्हा प्रशासनाच्या पडताळणीत बोगस लाडक्यांची मोठी संख्या समोर आली आहे. खुद्द दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गैरप्रकार झाल्याचं उघड झालंय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं उघड झालंय. निकषात न बसलेल्या लाखो लाडकींसह सरकारी कर्मचार आणि पुरुषांनीही सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या अर्जांच्या पडताळणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यातही बोगस लाडकींचा सुळसुळाट असल्याचं स्पष्ट झालंय. त्याची संख्या आपण पाहूया.

बोगस लाडकींचा सुळसुळाट

अजितदादांच्या पुण्यात सर्वाधिक 2 लाख लाडक्या अपात्र

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 1 लाख 25 हजार बोगस लाडक्या बहिणींची नोंद

भुजबळ, भुसे, कोकाटे, झिरवाळांच्या मतदारसंघात 1 लाख 86 हजार अपात्र

विखे पाटलांच्या अहिल्यानगरात 1 लाख 25 हजार बोगस लाडक्या

संजय शिरसाटांच्या संभाजीनगरात - 1 लाख 4 हजार बोगस लाडक्या

मुश्रीफ, आबिटकरांच्या कोल्हापुरात 1 लाख बोगस लाडक्यांची नोंद

आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरात 1 लाख 13 हजार अपात्र

सोलापुरात 1 लाख, सांगलीत 90 हजार, साताऱ्यात 86 हजार अपात्र

दरम्यान लाडकी बहिण योजनेचा लाभ बोगस लाभार्थ्यांनी घेतल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय़ उत्तर दिलंय पाहा. निवडणूक तोंडावर होत्या म्हणून तपासणी झाली नाही, ही गोष्ट मंत्री भुजबळांनी मान्य केली आहे. तर चौकशीच्या नावाखाली 50 टक्के महिलांना कमी करण्याचा सरकारचा प्लान असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केलाय.

राज्यभरातील सर्व पात्र 'लाडक्या बहिणींची पुन्हा ई केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या योजनेचा सरकारच्या तिजोरीवर भार आलाय. त्यामुळे विकासकामेही रखडली आहेत. अपात्र लाडकींना कमी करुन गरजू महिलांपर्यंतच योजनेचा लाभ दिला जाणार का? बोगस लाडकींकडून पैसे वसुल होणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT