Maharashtra government signs MoU with Elon Musk’s Starlink to bring high-speed satellite internet to villages. saam tv
महाराष्ट्र

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Satellite Internet to Reach Villages Soon : राज्यातील ग्रामीण भागात हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने इलॉन मस्कच्या स्टारलिंकसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. नियामक मंजुरीनंतर ही सेवा सुरू होणार आहे

Bharat Jadhav

राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्यात MoU साइन करण्यात आले.

गावखेड्यात हायस्पीड सॅटेलाइट इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डिजिटल महाराष्ट्रच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

जगविख्यात उद्योजक इलॉन मस्क यांची कंपनी असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडशी महाराष्ट्र सरकारने करार केलाय. स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागसह झालेल्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. गावखेड्यात हायस्पीड इंटरनेट पोहोचणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याची दिशेने ही वाटचाल असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. केंद्राच्या दूरसंचार विभागाकडून स्टारलिंक कंपनीला आवश्यक नियामक आणि अनुपालन परवानग्या मिळाल्यानंतरच ते अंमलात येणार असल्याची माहितीही राज्य सरकारने दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित या सामंजस करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली. यानंतर स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरलंय. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने आपण राज्यातील शेवटच्या गावापर्यंत डिजिटल दरी मिटवत आहोत. प्रत्येक शाळा, प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

हे ‘डिजिटल इंडिया’च्या ग्रामीण पातळीवरील आदर्श मॉडेल ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे ध्येय म्हणजे कुठेही, कोणत्याही पार्श्वभूमीतील लोकांना उच्च गतीची इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. स्टारलिंकचे ध्येय म्हणजे पारंपरिक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या लोकांना डिजिटल विश्वात सामावून घेणं आहे. या माध्यमातून शासन संस्था, ग्रामीण समुदाय तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रहाधारित इंटरनेट सेवा उपलब्ध केली जाणार आहे. ही भागीदारी भारत सरकारकडून मिळणाऱ्या नियामक व कायदेशीर मंजुरींवर आधारित असेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT