'लाडकीच्या मनात शिंदेच मुख्यमंत्री'; निवडणुकीच्या तोंडावर निलम गो-हेंचं वक्तव्य, VIDEO

Maharashtra Political news : पालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असतानाच महायुतीतीत धुसफूस समोर आलीय. आता शिंदे सेनेच्या नेत्या निलम गो-हे यांचं मुख्यमंत्रिपदाबाबतचं विधान वादाला कारणीभूत ठरलंय. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत नेमका काय वाद रंगलाय...पाहूया एक रिपोर्ट..
eknath shinde
eknath shindex
Published On

महायुती सरकार एक वर्षाची वाटचाल करत असताना तिन्ही पक्षातील मतभेद वारंवार समोर आले आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर तर मित्र पक्षांतील धुसफूस भाजपचं टेन्शन वाढवणारी आहे. आता शिंदे सेनेच्या नेत्या आणि विधान परीषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांचं ताजं वक्तव्य महायुतीत वादाची ठिणगी टाकणारं आहे. लाडकी बहिण योजनेमुळे एकनाथ शिंदेंच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं गो-हे म्हणाल्यात.

eknath shinde
Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

मुंबईतील एका कार्यक्रमात शिंदेंच्या उपस्थितीत गो-हे यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्कील विधान केलंय.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला मोठं यश मिळालं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला वर्गाची मते मिळवण्यात यशस्वी झालेत. मोठा गाजावाजा झालेली ही योजना आता सरकारला डोईजड झाली आहे.

eknath shinde
Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

काटेकोर निकष लावल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्याही घटत चालली आहे. मात्र पालिका निवडणुकीत या योजनेचं श्रेय घेण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लाडकीचं मत देवाभाऊंच्या भाजपला जातं की शिंदेंच्या शिवसेनेला याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com