CM Devendra Fadnavis: रखडलेल्या प्रकल्पांवरुन मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप; शांत, संयमी फडणवीसांचा रुद्रावतार

CM Devendra Fadnavis Warns Contractors: मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. विलंबित प्रकल्पांवरून अधिकारी आणि कंत्राटदारांना खडेबोल सुनावलं.
CM Devendra Fadnavis Warns Contractors
CM Devendra Fadnavis expresses strong displeasure over delayed projects during Mantralaya review meeting.saam tv
Published On
Summary
  • अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना तंबी

  • मंत्रालयात राज्यातल्या रखडलेल्या 21 प्रकल्पांचा आढावा बैठक

  • रखडलेल्या प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची चांगलीच खरडपट्टी काढली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत संयमी आणि अभ्यासपुर्ण वक्तृत्वासाठी विशेष ओळखले जातात. जनतेच्या प्रश्नावर मात्र याच शांत संयमी मुख्यमंत्र्यांचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. होय. रखडलेल्या प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची चांगलीच खरडपट्टी काढली.

मंत्रालयात राज्यातल्या रखडलेल्या 21 प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राणा भीमदेवी रूप अधिकाऱ्यांना पाहायला मिळालं.मुंबई, एमएमआर परिसर आणि पुण्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत बैठक घेण्यात आली होती. यातल्या काही रखडलेल्या प्रकल्पांवर नजर टाकूयात.

CM Devendra Fadnavis Warns Contractors
PM, CM ला उडवून देऊ; महाराष्ट्रातील खासदाराची थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांना धमकी

मुंबई मेट्रो लाईन - 2 बी मार्ग

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो लाईन प्रकल्प

शिवडी ते वरळी जोडमार्ग प्रकल्प

पुण्यातील मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-3

नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प

मुंबईतील एन.एम.जोशी बीडीडी चाळ प्रकल्प

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

उत्तन विरार सी लिंक प्रकल्प

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प

CM Devendra Fadnavis Warns Contractors
Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

अनेक महापालिकांवर प्रशासक असल्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची राजरोसपणे मनमानी सुरुये. आणि यालाच चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री आता अँक्शनमोडमध्ये आल्याचं दिसलंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील आणि एमएमआरडीएतले नियोजित प्रकल्प संथ गतीनं सुरु असल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि प्रशासकीय खर्च वाढत असल्याचं दिसतंय. आधीच सरकारी तिजोरीवरील ताण वाढलेला असतांना, निर्ढावलेले अधिकारी आणि मस्तवाल कंत्राटदारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आता थेट तंबी दिल्यानं हे प्रकल्प लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा करूयात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com