Employment update Saam tv
महाराष्ट्र

Employment : राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, कुणाला होणार थेट फायदा?

Employment update : राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे.

Ganesh Kavade

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

राज्यातील तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण होणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय.

या करारानुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार आहे. तेथे शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यात. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिलीये. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्यांनी यावेळी नमूद केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात तापमानाचा पारा 6.2°c वर

फॉर्म १३ ची गरज नाही, नोकरी बदलताच ५ दिवसांत पीएफ ट्रान्सफर

Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; सोशल मीडियावर पोस्ट करत केला 'जय महाराष्ट्र'

Konkan Travel : 'गणपतीपुळे'जवळ वसलाय भव्य किल्ला, ऐतिहासिक वैभव पाहून डोळे दिपतील

Nilesh Sable-Bhau Kadam : निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र? 'त्या' VIDEOनं चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT