टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार? U-19 World Cup चं वेळापत्रक समोर, पहिला सामना कधी?

U-19 World Cup time table : टीम इंडिया आणि पाकिस्तान भिडण्याची शक्यता कमी आहे. U-19 World Cup चं वेळापत्रक समोर आलं आहे.
india vs pakistan
Asia Cup 2025Saam tv
Published On
Summary

अंडर-१९ विश्वचषक २०२६ स्पर्धा १५ जानेवारीपासून सुरू होणार

भारताचा पहिला सामना अमेरिकेशी U-19 संघाशी होईल.

भारत आणि पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये

आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-१९ पुरुष विश्वचषकाबाबत मोठी घोषणा केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत होणाऱ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडण्याची शक्यता कमी आहे. स्पर्धेत १६ संघ आहेत, त्यांना चार ग्रुपमध्ये विभागलं आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्ये लढत होण्याची शक्यता कमी आहे.

india vs pakistan
कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

सीमेवर झालेल्या चकमकीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले होते. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे सामने थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. याचदरम्यान पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकाच्या स्पर्धेत दोन्ही संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असणार आहे.

आयसीसीने बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी अंडर-१९ विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. अंडर-१९ वनडे विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ १५ जानेवारी रोजी होईल. तर ६ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.या स्पर्धेत एकूण १६ संघ असणार आहेत. तर या १६ संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे.

india vs pakistan
छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

५ वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला ग्रुप एमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ग्रुपमध्ये टीम इंडियासहित न्यूझीलँड, बांगलादेश आणि अमेरिकेच्या संघाचा समावेश आहे. या स्पर्धेचा पहिला सामना झिम्बॉब्वेमधील मैदानात भारत आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. दुसरीकडे ग्रुप बीमध्ये पाकिस्तान, यजमान झिम्बॉब्वे, इंग्लंड, स्कॉटलँड या संघाचा समावेश आहे. सी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, आयरलँड, जपान आणि श्रीलंकेचा समावेश आहे. ग्रुप डीमध्ये तंजानिया,वेस्टइंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. मागील २ अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते.

india vs pakistan
Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

१५ जानेवारी - भारत विरुद्ध अमेरिका

१७ जानेवारी - भारत विरुद्ध बांगलादेश

२४ जानेवारी - भारत विरुद्ध न्यूझीलंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com