Panand Road Yojana Maharashtra Farmers  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Panand Road Yojana Maharashtra Farmers: शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रोड योजना जाहीर जाहीर करण्यात आहे. या योजनेचा उद्देश जमिनीचे वाद संपवणे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण संपर्क सुधारणे आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा.

  • शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत रस्ता मिळणार.

  • शेतकरी बांधावरील वाद आणि कटकट कमी होणार.

शेतात रस्त्यावरून अनेक वेळा वाद होताना आपण पाहिली आहेत. शेतात नसल्यानं शेतकऱ्यांचे बांधा शेजारील शेतकऱ्यासोबत कटकट, भांडणं होत असतात. आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' नवीन योजनेची घोषणा करण्यात आलीय. यासह विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह समितीतील खासदार आणि आमदार उपस्थित होते. शेतातील रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा, तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडविणारी ही योजना आहे. शेतापर्यंत रस्ते,वीज आणि पाणी पोहचले तर शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होईल. यासाठी सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिलाय. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यकाही होणे आवश्यक आहे.

यासाठी प्रथमतः सीमांकन करणे आवश्यक आहे. सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा. विविध १३ योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता

ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकीची समस्या दूर करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे. तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT