Cm Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : सत्तास्थापनेसाठी दिल्लीत महाबैठक, एकनाथ शिंदेंच्या अमित शाहांकडे ४ मागण्या

Eknath Shinde Meeting With Amit Shah : एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर महत्त्वाच्या चार मागण्या केल्या आहेत. भाजपकडून काही मागण्या फेटाळण्यात आल्यात. तर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावे, अशी मागणीही केली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

विधानसभेच्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले. पण खातेवाटपावर दिल्लीत चर्चा झाली. गुरुवारी अमित शाह यांच्या नेतृत्वात महायुतीची महाबैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर चार मागण्या केल्याचं समोर आलेय.

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याला भाजप हायकमांडने मान्यता दिली. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची कमान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या 4 प्रमुख मागण्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडल्याचं समोर आलेय. जाणून घेऊया शिंदे यांनी सरकारकडे काय मागितले?

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत बैठक घेतली, त्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर हा मुकुट बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार प्रमुख मागण्या अमित शहांसमोर ठेवल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मागितलेलं आहे. सध्या शिवसेनेकडे केंद्रात राज्यमंत्रीपद(स्वतंत्रकारभार) आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यात १२ मंत्रिपदे मागितली आहे. विधान परिषदेचे अध्यक्षपदावरही एकनाथ शिंदे यांनी दावा ठओकलाय. त्याशिवाय पालकमंत्र्यांच्या वाटाघाटीत योग्य तो मान मिळावा. गृह व नगरविकास खाती देण्यात यावी अशी मागणी शिंदेंनी केली.

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाची केलेली मागणी भाजपने अमान्य केल्याचं समजतेय. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना राज्य गृहमंत्रालय देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्याशिवाय नगरविकास खात्यावर भाजपने दावा केलाय. भाजपकडून शिंदेंना सामाजिक बांधकाम आणि महसूल खाते देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. आता शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

SCROLL FOR NEXT