Ladki Bahin Yojana update  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत २ कारणे सांगितली.

Vishal Gangurde

आता लाडकी बहीण योजनेची eKYC मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत

अवकाळी पाऊस आणि महिलांच्या मागणीनंतर घेतला निर्णय

eKYC दुरुस्तीसाठी सरकारकडून शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकीच्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आलीये. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीतील चुका सुधारण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु सरकारने लाडकींना शेवटची संधी दिली आहे. लाडक्या बहि‍णींच्या मागणीनंतर निर्णय घेतल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत ३१ मार्चपर्यंत केली होती. तरीही काही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी eKYC केली नव्हती. या महिलांनी लेखी पत्र देत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे eKYCची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने हजारो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती'.

तत्पूर्वी, काही लाडक्या बहि‍णींनी ईकेवायसी करताना काही चुका केल्या होत्या. लाभार्थ्यांना त्या चुका दुरूस्त करण्याची संधी आहे. या लाभार्थी महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT