Governement Decision Saam Tv
महाराष्ट्र

Governement Decision: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ; सरकारचा मोठा निर्णय

Governement Decision of Remove Import Duty: राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कापसावरील ११ टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केले आहे. केंद्र सरकारने काल जाहीर केल्यानुसार 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ केलं आहे. देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणे, कपड्याच्या उद्योगाचा उत्पादन खर्च कमी करणे , निर्यात स्पर्धात्मकता सुधारून भारताच्या "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देणे., या उद्देशाने कापसावरील हे आयात शुल्क माफ करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मात्र देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे व कापसाचे भाव पडण्याची शक्यता आहे आधीच कापूस उत्पादनावरील खर्च वाढलेला असताना हा निर्णय घेणे हा शेतकऱ्यांचा हिताचा नाही यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असा इशारा शेतकरी नेते रविकांत उपकर यांनी दिला आहे.

कापसाला भाव मिळत नसल्याने आधीच कापूस उत्पादक शेतकरी शेतकरी संकटात आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे कापसाची शेती लागवड ही कमी होत जात आहे. गेल्या तीन वर्षात राज्यातील कापूस लागवडीची स्थिती काय होती.

२०२३ - ४२.२२ लाख हेक्टर.

२०२४ - ४०.८४ लाख हेक्टर.

२०२५ - २५.५७ लाख हेक्टर.

सरकारने कापूस आयात करण्याची अकरा टक्के कर माफ केल्याने राज्यातील व देशातील कापसाचा दर अजूनही कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस लागवड परवडण्याच्या बाहेर जाईल अशी भीती आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT