Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Maharashtra Government: सरकारविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. नागपूर, संभाजीनगर, नांदेड, हिंगोलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?
Farmer ProtestSaam Tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बळीराजाचा एल्गार पाहायाला मिळालाय. कर्जमाफीसाठी चक्का जाम करत, शेतकऱ्यांना सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. या आंदोलनात नेमकं काय झालं? सरकारविरोधात शेतकऱ्यांचा संताप का उसळलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

शेतकऱ्यांच्या संतापाचा हा भडका उडालाय सरकारविरोधात. निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या सरकारला आश्वासनाचा विसर पडलाय. त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांनी चक्का जाम केलं. कुठे महामार्गावर आंदोलन करत तर कुठे पत्ते उधळत कृषी मंत्र्यांचा निषेध केलाय. मुंबई- आग्रा महामार्गही आंदोलकांनी रोखून धरल्यानं मुंबई -आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूर, संभाजीनगर, नांदेड, हिंगोलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात घुसू अशा इशाराच सरकारला दिलाय. एकीकडे लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींची तरतूद केली जाते. मात्र दुसरीकडे सरकारकडून शेतकऱ्यांचं ३१ हजार कोटींचे कृषी कर्ज थकीत आहे.

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?
Latur Farmer : बळीराजाची परवड थांबेना; विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला अन्..., वाचा स्पेशल रिपोर्ट

रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेणार का? सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासनं सरकार आता तरी पूर्ण करणार का? की शेतकऱ्यांच्या मरणयातना अशाच सुरू राहणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?
Farmer Issue: नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाने द्राक्ष बागा जलमय; शेतकऱ्यांमध्ये करपा-मावा रोगाची भीती|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com