यंदाच्या हंगामात ४ ही धरणे १०० टक्के भरण्याची पाहिली वेळ
पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर १०० टक्के भरले
खडकवासला धरणातून ३९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्वबकरण्यात येणार
मुठा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ
धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे
नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असून, वीर धरणाबद्दल 54 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी हे, निरा नदी पात्रात सोडले जातेय..... त्यामुळे नीरा नदी काठी पूरस्थिती निर्माण झालीय... नीरा शहरा नजीक असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला जुना ब्रिटिशकालीन पूल पाणी खाली गेलाय... तर ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते तेथील दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलेय.. नीरा नदी काठच्या गावांमध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय... पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आणखी पाणी सोडलं जाऊ शकतं.... असं देखील पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आलय...
* उजनीतून भीमा पत्रात 76 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू...
* भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा...
* उजनी धरणाच्या 16 दरवाजातून विसर्ग सुरू...
* दौंड मधून उजनी मध्ये येत आहे 27456 क्युसेकने आवक...
- सकाळी १० वाजल्यापासून गंगापूर धरणातून २६६७ क्यूस एक वेगाने पाण्याचा विसर्ग
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग वाढवला
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 86 टक्के भरले
- पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाणार
वसई तालुक्यात आज सकाळपासून 1 हजार 915 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 212.77 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.
वसईत सर्वाधिक पाऊस हा वसईच्या कामन परिसरात 272 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर मांडवी व पेल्हार येथे 264 मिलीमीटर झाला असल्याची नोंद झाली आहे.
विरार मध्ये 208 मिलीमीटर, तर वसई 207 मिली मीटर पाऊस पडला आहे. आणि वसईच्या माणिकपूर येथे 203 तर निर्मळ 178 मिलीमीटर, यामध्ये विरारच्या बोळींज ठिकाणी 175 मिलीमीटर आणि आगाशी 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22 हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. तर जूना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाची आणखी दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता यांनी दिली आहे.
घटमाथ्यावरील पावसाचे आगार अशी ओळख असलेल्या लोणावळा परिसरामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेले 24 तासात तब्बल 432 मिलिमीटर पाऊस लोणावळा शहरामध्ये झाला आहे. मुसळधार पाऊस व सोबत वेगाने वाहणारे वारे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लोणावळा शहरातील वलवन, नांगरगाव, बाबदेव रोड, नारायणी धाम, कडे जाणारा रस्ता, बद्रीविशाल सोसायटी, बस स्थानक, बाजारातील रस्ते नवीन पोलीस स्टेशनच्या समोरील रस्ता हेजलमय झाले असून वाहने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे..
तानसा नदी वरील पुल पाण्याखाली नदीने ओलांडली धोक्याची पातळी तानसा धरणाचे 35 दरवाजे उघडले धरणातून 38684 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तानसा नदीवरील वाशिंद पिवळी- कांबारा रस्त्यावरील सावरोली पुल पाण्याखाली गेल्याने रहदारीचे मार्ग पुर्णपणे बंद झाले आहे.
कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या 10 मिनिटं उशिराने धावत आहेत
धीम्या मार्गावरील गाड्या 8 मिनिटं उशिराने धावत आहेत
कल्याणहून CSMT ह्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या 13 मिनिटं उशिराने धावत आहेत
धीम्या मार्गावरील गाड्या 9 मिनिटं उशिराने धावत आहेत
मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले आहे. पुढील ३ तासांत मुंबई शहर , मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
यवतमाळच्या पुसद येथील ईसापुर धरणातील विसर्गाच्या तोंडी असलेल्या देवगव्हाण जुने या गावातील शेती जलमय झाल्या असून चार ते पाच घरे पाण्यात बुडाली आहेत त्यात कोंबड्या व शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या ईसापुर धरणातील सात दरवाजे दोन मीटरने व सहा गेट दीड मीटरने असे तेरा गेट उघडे असून त्यातून 74284 पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आह. तर जगापूर गावचा दळणवळण संपर्क कालपासून बंदच आहे.परिसरातील गौळ बुद्रुक भांबरखेडा ,दगड धानोरा, इसापूर येथे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
वरंध घाटात दरड कोसळली
० सार्वजनिक बांधा काम विभागामार्फत दरड हटवण्याचे काम सुरु
० रायगड आणि भोर म्हणजेच पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्यामुळे बंद
पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत दहा ते पंधरा हर्बल लोकल सेवा उशिराने धावत आहे
मुसळधार पावसाचा फटका रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना बसलेल्या दिसून आला
मात्र आज पाऊस कधी असल्यामुळे लोकल सेवा सुरळीत धावताना दिसून येत आहे मात्र हार्बर सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे
कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ येथील घटना
जखमींमध्ये दोन महिला तर एका वृद्धाचा समावेश
जखमी अवस्थेतील दोन महिलांना सावर्डे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर जखमी वृद्धाला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं
पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव यांनी जखमींची केली विचारपूस
पन्हाळा तहसीलदार यांनी केली घटनास्थळाची पाहणी
वित्तहानीचा महसूल विभागाकडून पंचनामा सुरू
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती
पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल सुरू
पहाटे पाच वाजता पंचगंगा 39 फुटांवर पोहोचत इशारा पातळी गाठली
पहाटे 6 वाजता 39 फूट 3 इंचावर जात इशारा पातळी ओलांडून डोक्याच्या पाचेकडे वाटचाल सुरू केली
85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच गेल्यानं वाहतूक विस्कळीत
कोकणाकडे जाणारे मार्ग अद्यापही बंदच
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि असं असलं तरी सुद्धा काही पुणेकर मॉर्निंग वॉक चुकवत नाहीत. पुण्यातील z ब्रीज वर भर पावसात रेनकोट आणि छत्री घेऊन एक ग्रुप मॉर्निंग वॉक साठी आला होता. भिडे पूल पाण्याखाली गेला की पुण्यात समाधानकारक पाऊस झाला तसेच मुठा नदी सदैव अशीच दुथडी भरून वाहो आणि नदीतली दुर्दैवाने होणारी घाण सुद्धा निघून जावो अशी अपेक्षा यातील पुणेकर काकांनी केलीय. भर पावसात आनंद घेताना मॉर्निंग वॉक मेंबर्स सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...
पालघर _पालघरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग. आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज.खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यातील शाळा ,महाविद्यालये,अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर. सूर्या प्रकल्पाच धामणी धरण 100 टक्क्यांनी भरलं. जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर. सूर्या नदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत.आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना आवाहन. सूर्या नदीच्या किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तरुणांमधून पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे नद्यांना आता पुराचे स्वरूप आला आहे. साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमी आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. या स्मशानभूमीतील सर्व अग्नीकुंड पाण्यात गेल्यामुळे इथं आता अंत्यविधी करता येणार नाहीत. साताऱ्यातील संगम माऊली परिसरातून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी
वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीला नदीच्या पाण्यामध्ये वाढवत आहे कृष्णाची पातळी ही तब्बल 34 फुटांवर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे काही सकल भागामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे सांगली मधील तब्बल 19 कुटुंब १२७ लोकांना प्रशासनाने स्थलांतरित केले आहे. संध्याकाळपर्यंत चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच आज आणि उद्या दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कृष्णेची इशारा पातळी ही चाळीस फुटावर आहे. त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी.
मागील पाच दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 5 नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरूच असून यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर याचा परिणाम जाणवू लागला आहे जिल्ह्यातील मुख्य धरणं शंभर टक्के भरण्याच्या जवळ पोहोचली असल्यामुळे धरण प्रशासनाने धनातून विसर्ग करण्याचा निर्णय घेत धरणातून पाणी सोडल आहे. यामुळे जिल्ह्यातील पश्चिमेकडून वाहणाऱ्या सर्वच नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत यामुळे अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत तसेच काही गावातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्यामुळे या गावातील अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आल आहे यामध्ये पाटण कराड महाबळेश्वर वाई सातारा या सहा तालुक्यातील 129 कुटुंबातील 361 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल आहे तसेच जिल्ह्यातील दहा रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले असून हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ज्या भागांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आले आहे त्या भागातील नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये तसेच ज्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून पुराचं पाणी गेल आहे या ठिकाणाहून प्रवास करू नये तसंच नदी पत्राच्या जवळ जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी,अशी जोरदार मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन,उडीद,मूग आणि कांदा यांसारखी सर्वच खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी, पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याने पंचनाम्याची गरज नसून सरसकट मदतीची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटलंय.
पिंपरी चिंचवड शहराच ग्राम दैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पवना नदीचं पाणी शिरलं आहे. मंदिराचा जवळपास 30 भाग पाण्याखाली गेल आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोरया मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे
सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम असून गेल्या 24 तासांमध्ये 100 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरण 93% इतकं भरलं आहे.धरणातुन सुरू असलेले विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून 39 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदी पात्रात सुरू आहे,त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन वारणा नदी पात्रा बाहेर देखील गेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीमा-भामा खोऱ्यातील तीन धरणे आणि कुकडी प्रकल्पातील सातही धरणे ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पावसाचा जोर असाच वाढत राहिला, तर भीमा, भामा, घोड आणि मीना नदीपात्रातील पाणीपातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.