Railway  Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक एक्सप्रेस, ११ ठिकाणी थांबणार, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

Shirdi to Tirupati weekly express full route : शिर्डी–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही ट्रेन ४ राज्यांतून जाणून असून ३१ स्थानकांवर थांबणार आहे. महाराष्ट्रात ११ ठिकाणी थांबे असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे

Namdeo Kumbhar

  • शिर्डी ते तिरुपती एक्सप्रेस सुरू झाली आहे.

  • महाराष्ट्रात तिरुपती–शिर्डी ट्रेन कुठे थांबणार?

  • तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेस वेळापत्रक वाचा

  • मराठवाड्याला होणारे कनेक्टिव्हिटीचे फायदे

Complete timetable of Tirupati–Sainagar Shirdi weekly Express : महाराष्ट्राला आणखी एक एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शिर्डी ते तिरूपती ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. चार राज्यातून ही ट्रेन धावणार आहे अन् ३१ स्थानकात थांबणार आहे. शिर्डी ते तिरूपती हा ३१ तासांचा प्रवास असेल. केंद्रीय मंत्री व्ही.सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. शिर्डी-तिरूपती या एक्सप्रेस ट्रेनचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील लोकांना होणार आहे. ही एक्सप्रेस राज्यात ११ स्थानकात थांबणार आहे, त्यामधील बहुतांश स्थानके ही मराठवाड्यातीलच आहे. त्यामुळे मराठवाड्यात प्रवास कऱण्यासाठी नवीन ट्रेन मिळणार आहे. त्याशिवाय शिर्डी अन् तिरूपती ही दोन देवस्थानेही या ट्रेनमुळे जोडली जाणार आहेत.

नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे तिरुपती आणि शिर्डी ही तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत. या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड यासह इतर महत्त्वाच्या ३१ ठिकाणी या ट्रेनला थांबे आहेत. या ट्रेनमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन, कनेक्टिव्हिटी सुधारणार आहेच. त्याशिवाय मार्गाच्या आसपासच्या परिसरातल्या आर्थिक विकास वाढणार आहे. नवीन रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच यामुळे परळी वैजनाथ हे शिवभक्तांसाठी महत्त्वाचं असलेले तीर्थक्षेत्रदेखील जोडले जाणार आहे.

Tirupati–Shirdi Weekly Express महाराष्ट्रात एक्सप्रेस कुठे-कुठे थांबणार ट्रेन?

शिर्डी,कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी,लातूर रोड आणि उदगीर या स्थानकावर शिर्डी-तिरूपती एक्सप्रेस ट्रेन थांबणार आहे.

तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वेचा प्रवास सुसाट होणार आहे. आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागापासून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी पहिली थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. तिरुपती आणि शिर्डी या भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जोडणाऱ्या या सेवेमुळे यात्रेकरूंची अधिक चांगली सोय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

PF काढणं ते ट्रान्सफर करणे, EPFO च्या नियमात झाले ६ महत्त्वाचे बदल, वाचा A टू Z माहिती

Dhurandhar Viral Video: रणवीर सिंगच्या धुरंधरच्या गाण्याची पाकिस्तानमध्ये हवा; लग्नात थिरकतात वऱ्हाडी, पाहा व्हायरल VIDEO

Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

Jowarichi Ukadpendi Recipe: ज्वारीच्या भाकऱ्या करायला कंटाळता? ही भन्नाट डीश ठरेल बेस्ट, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT