Maharashtra Municipal Election Saam TV
महाराष्ट्र

Municipal Corporation Election: दिवाळीत उडणार महापालिकेच्या निवडणुकांचा बार ? चार टप्प्यात होणार निवडणुका

Maharashtra Municipal Election : राज्यात ऑक्टोंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत.

Bharat Jadhav

मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता लवकरच महापालिकांच्या निवडणुका होतील. याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केलीय. निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.

चार टप्प्यांमध्ये पार पडणार निवडणुका

राज्यात ऑक्टोंबर महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये होणार आहेत.

ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली असून त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून त्याबाबत तायरी सुरू करण्यात आलीय.

तयारी होऊनही निवडणुका झाल्या नाहीत

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुकांना मुहूर्तच लागत नव्हता. कधी कोरोनाच्या संसर्गाचे कारण, तर कधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे निवडणुका झाल्या नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर २०२० पासून राज्यात कुठे एकदा तर कुठे दोनदा, तीनदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. पण या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत.

जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ६ मे रोजी निर्णय दिला होता. ओबीसींना २०२२ पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. तसेच चार आठवड्यांच्या आता निवडणुकांसदर्भातील अधिसूचना काढाव्यात असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.

२०२२ मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला ४ आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांच्या घरासमोर मद्यपी तरुणाचा गोंधळ, घरात घुसण्याचा प्रयत्न अन्...; पाहा व्हायरल व्हिडिओ

Maharashtra Live News Update: नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार, मालेगावात 'नारीशक्ती'ने काढला मोर्चा

Jalgaon : गृहराज्यमंत्री, कृषीमंत्री व जलसंपदा मंत्र्यांच्या फोटोला लावला चुना; ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

Pune : फिरायला जाणं जीवावर बेतलं! पुण्यातील धरणात १९ वर्षीय तरुण बुडाला, तब्बल २४ तासांनी मिळाला मृतदेह

Kareena Kapoor Khan: करीना कपूर खानचा ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT