Belgaum Black Day News Saam Tv
महाराष्ट्र

Belgaum Black Day : बेळगावात काळा दिवस; महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारविरोधात निषेध, शिवसेना नेत्यांना प्रवेशबंदी

Belgaum Black Day News : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने आज काळा दिन पाळला असून कर्नाटक सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली असून सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिन पाळला

शिवसेना नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आले

कर्नाटक पोलिसांचा सीमाभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

मराठी-कन्नड तणाव वाढू नये म्हणून प्रशासन सज्ज आहे

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी बेळगावसह सीमा भागामध्ये मराठी नागरिकांकडून काळा दिन म्हणून साजरा केला जातो. आज कर्नाटक राज्याचा राज्योत्सव असल्याने या संपूर्ण परिसरात काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीसह मराठी जनतेकडून आज बेळगाव मध्ये रॅली काढून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येतो.

या रॅलीमध्ये बेळगाव सह सीमा भागातील मराठी जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होत असते. गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातून शिवसेना उभाठाचे नेते या रॅलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र या नेत्यांनी काळा दिन रॅलीमध्ये सहभागी होऊ नये तसेच बेळगाव हद्दीत येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने त्यांना बेळगाव जिल्हा बंदीचे आदेश काढण्यात येतात.

आजही शिवसेनेचे उपनेते संजय पवार सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांना बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा बंदीचे आदेश काढलेले आहेत. मात्र या आदेशाला झुगारून हे दोन्ही नेते शिवसैनिकांसह बेळगाव हद्दीत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांना आणि शिवसैनिकांना रोखण्यासाठी महाराष्ट्र - कर्नाटक सीमा असणाऱ्या दूधगंगा पुलावर कर्नाटक पोलिसांनी मोठा पोलीस फाटा तैनात केलेला आहे.

हातकणंगले खासदार धैर्यशील माने, ठाकरेंच्या शिवसेनचे विजय देवणे, शिवसेना उपनेते संजय पवार, सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना आज बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आज कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळणार आहे. खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेते आजच्या काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आक्षेपार्ह भाषण करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बेळगावातील कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्र बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. निपाणीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना काळा दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असल्याची माहिती मिळाली असल्याचे पत्रात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी नमूद केले आहे. या पत्राला अनुसरून बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांना बेळगाव जिल्ह्यात आज प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

SCROLL FOR NEXT