Shahapur News : गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला! ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर

Nashik News : शहापूर तालुक्यात गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव झाल्याने ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरल्याचा प्राथमिक अंदाज असून अजून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
Shahapur News : गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला! ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर
Nashik NewsSaam Tv
Published On
Summary

शहापूर तालुक्यात गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला

आजाराने ४ वर्षीय मुलीचा मृत्यू.

दूषित पाण्यामुळे आजाराचा फैलाव झाल्याचा प्राथमिक अंदाज

दोन रुग्णांची प्रकृती गंभीर, ठाणे व मुंबईत उपचार सुरू

नाशिकमधील शहापूर तालुक्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यात गॅस्ट्रोलने एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. शिवाय अजून २ जण गंभीर असल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हे कशामुळे होत आहे याचं कारण समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत मधील फणसपाडा येथे अनेक नागरिकांना गॅस्ट्रोलची लागण झाली आहे. या रुग्णांना उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये असलेल्या ४ वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला ठाणे येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तिला घेऊन ठाण्याकडे निघाले असता वाटेतच चिमुकलीचा मृत्यू झाला.

Shahapur News : गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला! ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर
Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

या चिमुकलीसोबतच आनिता बाळू भगत वय ३२ यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना देखील ठाणे येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रकाश पारधी या रुग्णाला प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायतील फणसपाडा येथे विहीरीचा पाणी पिण्यासाठी वापरत होते. यामुळे ही लागण झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Shahapur News : गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला! ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर
Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?

नागरिकांना त्रास होत असल्याने दोन दिवस कॅम्प लावला असला तरी तंज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली गेली नाही. केवळ उपकेंद्रातील डॉक्टर वर या कॅम्पचा भार दिल्याने तालुका आरोग्य विभागा मार्फत जी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते, ती सुविधा उपलब्ध न झाल्याने रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान रूग्णांवर फनसपाडा कॅम्प मध्ये तंज्ञ डॉक्टर नसल्याने उपचारासाठी रूग्णांना दुसरीकडे पाठवण्यात येत असल्याने अनेक रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशा परीस्थीत अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com