Vijay Wadettiwar slams Dhanjay Munde 
महाराष्ट्र

Maharashtra Drought: शेतकरी मेटाकुटीला, कृषीमंत्री परदेशवारीला; वडेट्टीवारांची मुंडेंवर सडकून टीका

Vijay Wadettiwar slams Dhanjay Munde : राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री परदेशात गेल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी धनंजय मुंडेंच्या परदेशदौऱ्यावर जोरदार टीका केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

मुंबई : धनंजय मुंडेंना सत्तेची मस्ती आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. तसंच राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. सत्ताधारी टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सूरू आहे, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. दुष्काळावरुन कसं राजकारण रंगलंय पाहूया.

राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात 15 ते 20 दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही. राज्यातील 75 टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. मात्र दुष्काळ आढावा बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडेच गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. यावरुनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलीये. राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.

दरम्यान राज्यातील काँग्रेस नेते दुष्काळ पाहणी दौरा करणार आहे. 31 मे पासून या दौऱ्याला सुरुवात होतेय..दुष्काळासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अकरा हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. सध्या 3 हजार 72 गावं आणि 7 हजार 931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. किती गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु पाहूया.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्स ?

संभाजीनगर - 708

जालना- 519

बीड- 433

धाराशिव- 146

ठाणे -47

सिंधुदुर्ग - 50

नाशिक -390

अहमदनगर-336

जळगाव - 108

पुणे - 256

सातारा - 202

सोलापूर - 207

बुलढाणा- 67

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारला दुष्काळ परिस्थितीवरुन घेरलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून त्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं. राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्यात. त्यामुळे राज्यातील जटील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुष्काळावरून राजकारण पेटलंय. त्यामुळे सरकारनं तातडीनं उपाययोजना करून दुष्काळग्रस्तांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT