Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं

Bihar Crime: बिहारमध्ये भयंकर घटना घडली. लग्नानंतर दहाव्या दिवशी एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या अंगावर उकळते तेल टाकले. या घटनेत महिलेचा नवरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं
Bihar CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • लग्नानंतर अवघ्या १० व्या दिवशी बायकोने नवऱ्याच्या अंगावर उकळते तेल ओतले

  • नवरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • पत्नीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

  • हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

बिहारमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या अंगावर उकळतं तेल ओतलं. लग्नाच्या दहाव्या दिवशी तिने हे भयंकर कृत्य केले. शिवहर जिल्ह्यातल्या पिपराही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मीनापूर बाघा गावात ही घटना घडली. नवविवाहित महिलेने नवरा मोहम्मद मुन्ना याच्या अंगावर उकळते तेल ओतले. या घटनेत मोहम्मद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीला मोहम्मद मुन्नाचे एका तरुणीसोबत थाटामाटात लग्न झाले. लग्नानंतर तो बायकोला घेऊन घरी आला. पण त्याच्या बायकोला त्याचे जवळ येणं अजिबात आवडत नव्हते. लग्नापासूनच त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण होते. तिने रागाच्या भरात नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. तिने ५ लिटर उकळते तेल आपल्या नवऱ्याच्या अंगावर ओतले. या हल्ल्यात मोहम्मद गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या मुझफ्फरपूर येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं
Buldhana Crime : जुन्या वादातून रक्तरंजित थरार, भर लग्नसमारंभात तरुणानं घातला धिंगाणा

मोहम्मद मुन्नाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नापासूनच घरामध्ये तणावाचे वातावरण होते. लग्न झाल्यापासून मोहम्मदची बायको विचित्र वागत होती. ती मोहम्मदला तिच्या खोलीत झोपून देखील देत नव्हती. लग्न झाल्यापासून ती मोहम्मदला जवळ येऊन देत नव्हती. एक दिवस तिने मोहम्मदला खोलीबाहेर बंद केले. वाद सोडवण्यासाठी त्याच्या बायकोच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. दोघांचीही समजूत काढण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच तिने मोहम्मदसोबत भयंकर कृत्य केले.

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं
Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

मोहम्मद मुन्ना आपल्या खोलीत झोपला होता. त्याचवेळी त्याची बायको स्वयंपाक घरात गेली. तिने चुलीवर सुमारे ५ लिटर मोहरीचे तेल उकळायला ठेवले. तेल पूर्णपणे उकळल्यानंतर ती ते घेऊन मोहम्मदच्या जवळ गेली. त्यानंतर तिने हे उकळते तेल झोपलेल्या मोहम्मदच्या अंगावर ओतले. त्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. कुटुंबातील सदस्य त्याच्या खोलीकडे धावले. मोहम्मदची अवस्था पाहून ते प्रचंड घाबरले. तो वेदनेने तडफडत होता.

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं
Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

मोहम्मदचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्याच्या बायकोला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यांनी मोहम्मदला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोहम्मदची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोहम्मदच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोहम्मदच्या बायकोने हे कृत्य का केले यामागचे कारण पोलिस तपासत आहेत.

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं
Crime News: धक्कादायक! आईचा खून करून तरुणाने स्वतःला खोलीत बंद केलं; मृतदेहाजवळ लागला खेळू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com