Buldhana Crime : जुन्या वादातून रक्तरंजित थरार, भर लग्नसमारंभात तरुणानं घातला धिंगाणा
Buldhana Crime NewsSaam tv

Buldhana Crime : जुन्या वादातून रक्तरंजित थरार, भर लग्नसमारंभात तरुणानं घातला धिंगाणा

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे जुन्या वादातून लग्न समारंभात तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Published on
Summary
  • बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे लग्नात चाकू हल्ला

  • जुन्या वादातून पुन्हा भांडण चिघळले

  • एक तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

संजय जाधव, बुलढाणा

लग्नाच्या आनंदी वातावरणाला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना बुलढाणा मधील कोलवड येथे घडली. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभातच तरुणावर चाकूने हल्ला केला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार आहेत. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन जाधव हा युवक गावातील शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित होता. लग्नसोहळा पार पडून पंगतीत जेवण सुरू असताना त्याचा गावातील नितीन सपकाळ याच्याशी वाद झाला. काही दिवसांपूर्वी कावड यात्रेदरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची पार्श्वभूमी असून त्याच कारणावरून पुन्हा वाद चिघळल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Buldhana Crime : जुन्या वादातून रक्तरंजित थरार, भर लग्नसमारंभात तरुणानं घातला धिंगाणा
Mulund Metro : मुंबईत मोठी दुर्घटना! मेट्रो पिलर स्लॅब थेट ऑटो अन् कारवर कोसळला, मलब्याखाली अनेकजण अडकले, एकाचा मृत्यू

वाद वाढताच आरोपी नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू घेत गौरव जाधव याच्यावर वार केला. या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार बुलढाणा पोलिसात झाली असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com