मराठमोळी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सलमान खान, इम्रान हाश्मीसोबत केलंय काम, सिनेसृष्टीवर शोककळा

pravina deshpande death : मराठमोळी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांनी सलमान खान, इम्रान हाश्मीसोबत काम केलं होतं.
pravina deshpande death news
pravina deshpande death Saam tv
Published On
Summary

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं निधन झालंय

देशपांडे यांनी 'रेडी' चित्रपटात सलमान खानसोबत केलंय काम

इम्रान हाश्मीसोबतही केलंय काम

मराठी सिनेसृष्टी गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं मंगळवारी निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री प्रवीणा यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रवीण यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'तस्कर'मध्ये त्यांनी काम केलं होतं. प्रवीणा देशपांडे यांच्या अभिनयाचं सिनेसृष्टीतील कलाकारांकडूनही कौतुक व्हायचं. त्यांनी चर्चेत राहण्यापेक्षा अभिनयाला अधिक महत्व दिलं. सिनेमात मिळालेल्या पात्राला न्याय देण्याचं काम प्रवीणा देशपांडे करायच्या.

pravina deshpande death news
प्रसिद्ध मराठमोळ्या रीलस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन

अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांनी सलमान खानच्या 'रेडी' सिनेमातही काम केलं आहे. या सिनेमात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केलं आहे. प्रवीणा यांची नीरज पांडे यांची 'तस्करी' सीरीजमध्ये अभिनयाची शेवटची झलक पाहायला मिळाली.

प्रवीणा यांनी मराठी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. त्या संवेदनशील अभिनयासाठी ओळखल्या जायच्या. अनेक हिंदी कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत काम केल्यामुळे प्रवीणा यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक जण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर काही जण त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

pravina deshpande death news
ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

कसा होता प्रवीणा यांचा सिनेसृष्टीतील प्रवास?

प्रवीणा यांचा नाटकातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पुढे त्यांनी टेलिव्हिजन आणि सिनेमात स्थान मिळवलं. मराठी मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप चाहत्यांवर पाडली. तसेच अनेक सिनेमांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी सलमानच्या 'रेडी' सिनेमातही काम केलं. त्या सिनेमात त्यांनी शालूची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com