Former Zilla Parishad Vice President Kamaraj Nikam joins the Ajit Pawar faction in Mumbai in the presence of Deputy CM Ajit Pawar. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Municipal Elections News: महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. ज्येष्ठ नेते कामराज निकम यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

  • आगामी जिल्हा परिषद निवडणूकीपूर्वी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय.

  • अजित पवार यांच्या उपस्थितीत कामराज निकम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

  • या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय.

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ बांधलंय. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.

कामराज निकम यांच्यासोबत शरद पवार गटाचे अनेक दिग्गज पदाधिकारी देखील सत्ताधारी राष्ट्रवादीत सामील झाले आहेत, मुंबईतील या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते, आगामी जिल्हा परिषद निवडणूकीपूर्वी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

यावेळी माजी मंत्री आमदार अनिल पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष दीपक जगताप, दूध संघाचे उपाध्यक्ष महेंद्र निकम, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. नितीन चौधरी, हिरालाल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विकासाच्या राजकारणावर भर देत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

कामराज निकम यांचा राजकीय प्रवास

या पक्षांतरामुळे तालुक्याच्या राजकारणात आणखी एकदा खळबळ उडालीय. शिंदखेडा नगरपंचायतीत अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या महिला नगराध्यक्षा निवडून आल्याने याठिकाणी पक्षाला बळ मिळालंय. त्याच पार्श्वभूमीवर कामराज निकम यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान कामराज निकम हे शिंदखेडा तालुक्यात संघटनात्मकदृष्ट्या प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांच्या अजित पवार गटात झालेल्या प्रवेशामुळे शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडलंय.

कामराज निकम यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिलाय. ते कधीकाळी माजी मंत्री रावल यांचे नीकटवर्तीय होते. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मंत्री रावल आणि कामराज निकम यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर कामराज निकम यांनी जयकुमार यांच्याशी फारकत घेत भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला. मात्र त्या पक्षातही ते फार काळ रमले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

ठाकरे बंधू एकत्र, भाजपच्या रणनीतीत बदल, ठाकरेंची युती शिंदेंच्या पथ्यावर

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

SCROLL FOR NEXT