Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

Pune Municipal Elections : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसेच्या जागावाटपाची अंतर्गत माहिती समोर आली आहे. १६५ पैकी ९१ जागांवर ठाकरे गट लढवणार आहे, तर मनसे ७४ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान अद्याप काँग्रेससी बोलणी सुरू, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.
Pune Municipal Elections
Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and MNS president Raj Thackeray during an alliance announcement meeting.saam tv
Published On
Summary
  • काँग्रेस पक्षाशी अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षाकडून बोलणी सुरू

  • पुण्यासाठी काँग्रेस सोबत आली तर थोडा प्रमाणात फॉर्म्युला बदलणार

  • पुणे महानगरपालिकेसाठी १६५ जागा

'आमची युती झाली, कोण किती आणि कोणाला किती जागा मिळणार हे आम्ही सांगणार नाही', असं म्हणत राज ठाकरेंनी जागा वाटपाचा मुद्दा पत्रकार परिषदेत गहाळ केला होता. मात्र आज अखेर दोन्ही पक्षाच्या जागावाटपाबाबतचा आकडा समोर आलाय. पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट शिवसेना आणि मनसेचे गणितं ठरले आहे. पुणे महानगरपालिकेसाठी १६५ जागा असून यात ९१ -७४ या फॉर्मुल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत.

Pune Municipal Elections
Uddhav Thackeray: मराठी माणसा, चुकशील तर संपशील! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झालीय. मात्र मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मात्र शहरातील युतीचे जागा वाटपही जवळपास निश्चित झालंय. शिवसेना ९१ तर मनसे ७४ जागा लढविणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिलीय.

Pune Municipal Elections
Corporation Election: युती झाली पण लढाई सोप्पी नाही; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपचा प्लान काय?

आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडी म्हणून लढविणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रयत्नही सुरू झालाय. मात्र त्याला काँग्रेसचा विरोध आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान, शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्यात युती झाली.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची जागा वाटपाची बोलणी सुरू झालीय. त्यासंदर्भातील बैठकाही सुरू झाल्या आहेत. या बैठकीतील चर्चेनंतर शिवसेनेला ९१ आणि मनसेला ७४ जागा मिळणार असल्याची माहिती पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. चार ते पाच जागांवर अद्यापही एकमत झालेले नसून त्यावर पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाशी अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षाकडून बोलणी सुरू आहे.

ती बोलणी झाल्यानंतर पुण्यासाठी काँग्रेस सोबत आली तर ठाकरे सेना आणि मनसेच्या फॉर्म्युल्यात थोडा प्रमाणात बदल होईल. पण जर काँग्रेस सोबत आली नाही तर ठाकरे सेना आणि मनसेचा ९१-७४ हाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. दरम्यान राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह एकूण २९ महानगरपालिकांमधील वॉर्डांची संख्या जाहीर झाली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com