BJP Emerges as Largest Party Saam tv
महाराष्ट्र

Nagarparishad Election Result: सुरूवातीचे कल हाती! महायुती १९० पालिकांमध्ये आघाडीवर, महाविकास आघाडीची स्थिती काय?

BJP Emerges as Largest Party: मतमोजणी सुरू असून सुरूवातीचे काल हाती आले आहेत. सुरूवातीच्या कलानुसार महायुती आघाडीवर असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Priya More

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. काही तासांमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीचे कल हाती आले आहेत. सुरूवातीच्या कलानुसार राज्यात महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. महायुती १९० जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली आहे. १० वाजल्यापासून पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचे कल हाती येऊ लागले आहे. सुरूवातीच्या कलानुसार महायुती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीचे कल हाती आला असून महायुती १९० जागांवर आघाडीवर आहे. त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपा १११ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर आहे. महायुतीमधील काँग्रेस पक्ष ३७ जागांवर, शिवसेना ठाकरे गट ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ८ जागांवर आघाडीवर आहे. तर स्थानिक आघाडी ८ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT