Nagarparishad Election Result: कोण होणार 'धुरंदर'? २८८ नगरपरिषद- नगरपंचायतीचा निकाल आज, १० वाजता EVM उघडणार

Nagar Panchayat Election Result: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल तर दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
Nagar Panchayat Election  Result
Nagar Panchayat Election ResultSAAM TV
Published On

Summary -

  • राज्यातील २८८ नगरपरिषद-नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार

  • सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

  • महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकांमध्ये थेट लढत झाली होती

  • मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा एकत्रित निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज अखेर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दुपारपर्यंत सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल हे आज स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये फक्त महायुतीच नाही तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे हा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत.

Nagar Panchayat Election  Result
Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

राज्यातील जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या ३ नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरीत ठिकाणी भाजपासह इतर पक्षांचे उमेदवार कशी कामगिरी करतात. त्यांचा विजय होतोय की नाही हे पाहणं महत्वाचे राहिल. निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबर रोजी २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर उर्वरित २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान झाले.

Nagar Panchayat Election  Result
Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

या दोन्ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. जर पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला पोलिस ताब्यात घेऊ शकतात.

Nagar Panchayat Election  Result
Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com