Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Local Body Election update : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या भागात मतदान आहे, त्याच ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Local Body Election update
Maharashtra voting Saam tv
Published On
Summary

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उर्वरित जागांसाठी शनिवारी मतदान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पुणे, यवतमाळ आदी जिल्ह्यातील काही भागात सुट्टी जाहीर

पुणे : राज्यातील काही नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उर्वरित जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उद्या म्हणजे २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मतदान आहे, त्याठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, यवतमाळ, ठाणे आदी भागांचा समावेश आहे.

पुण्यातील या भागात सार्वजनिक सुट्टी

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदेच्या मतदारसंघात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे.

Local Body Election update
तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

अधिसूचनेनुसार, मतदानाच्या दिवशी केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी मतदारांनी न चुकता मतदान करावे, असे आवाहन डुडी यांनी केलं आहे.

Local Body Election update
डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

यवतमाळ जिल्ह्यातील तीन पालिका क्षेत्रात सुट्टी

यवतमाळ नगरपरिषद, वणी- दिग्रस आणि पांढरकवडा नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे. यवतमाळ पालिकेत उद्या सर्वच प्रभागात मतदान होणार आहे. तर दिग्रस येथील तीन प्रभाग तर पांढरकवडा दोन आणि वणी येथे एक असे तीन पालिकेतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com