Maharashtra Government  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet: ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाख रोजगार निर्मिती; फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय

Maharashtra Government : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय झालं वाचा सविस्तर....

Priya More

Summary -

  • राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

  • महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले

  • ५० हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार निर्मिती केली जाणार

  • डॉ. आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी ५०० कोटींची विकास योजना

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ३ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. या धोरणाच्या कालावधीत ५ लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

त्याचसोबत द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजनेची घोषणा करण्यात आली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि काय निर्णय घेण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत...

उद्योग विभाग -

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाखांवर रोजगार निर्मिती केली जाणार आहे. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार आहे. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय असेल .

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.

विधि व न्याय विभाग -

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरशी कडाक्याचं भांडण होणार, नात्यात दुरावा येण्याची शक्यता; 5 राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update: मागील चार तासापासून जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्याचा रस्ता रोको सुरूच...

Palghar Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाच? पालघरजवळचे 'हे' Hidden sport नक्की फिरून या

IND vs PAK: भारत- पाकिस्तानी खेळाडूंचं सामन्यापूर्वीच हाय-फाईव्ह, पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी इथेच संपणार?

Elections : एकनाथ शिंदेंचा भाजप आणि काँग्रेसला दे धक्का! २ माजी आमदार, २५ नगरसेवक, १०० सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT