Maharashtra Budget Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डबल गुडन्यूज! कर्जमाफीसोबतच ₹४००० मिळणार, अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणेची अपेक्षा

Maharashtra Budget 2026 Announcement in Farmer: महाराष्ट्र सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता

कर्जमाफीसोबतच नमो शेतकरी योजनेबाबत घोषणा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांना डबल गुड न्यूज मिळू शकते. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकतो. यामध्ये कर्जमाफी, पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेबाबत निर्णय असतील. अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. याचसोबत शेतकऱ्यांसाठीच्या इतर योजनांच्या निधीला मंजुरी दिली जाऊ शकते.

कर्जमाफीची घोषणा होणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. ३० जूनपूर्वी याबाबत निर्णय घेऊन काम सुरु केले जाणार असल्याचे कृषी मंत्र्‍यांनी काल सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत अहवाल येणार आहे. त्यानंतर कर्जमाफी करु असं त्यांनी सांगितलं. याबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कृषी क्षेत्रासाठी घोषणा

२०२५ मध्ये राज्यात सरासरीपेक्षा १०९.१ टक्के पाऊस पडला. खरीप हंगामात १५७.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तृणधान्ये, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ११६.४० लाख शेतक-यांना ९४.८२ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९,०२२.३८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. सौर कृषी पंप योजनेंतर्गत माहे डिसेंबर २०२५ अखेर राज्यात ७.३७ लाख सौर पंप बसविण्यात आले आहेत.

नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची घोषणा (Namo Shetkari Yojana Installment)

राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. या योजनेचा आठवा हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे आता आठवा आणि नववा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अर्थसंकल्पात निर्णय होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT