Earthquake Update Saam Tv
महाराष्ट्र

Earthquake Update: मराठवाडा भल्या पहाटे हादरला, भूकंपाचा VIDEO आला समोर

Rohini Gudaghe

Hingoli Earthquake Video

मराठवाड्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणावले होते. परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणी भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. लागोपाठ दोन धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण (Maharashtra Breaking News) झालं होतं.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.६ ते ४.५ इतकी मोजली गेली आहे. या भूंकपाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (Latest Marathi News)

या भूंकपाच्या व्हिडिओमध्ये जमीन हादरल्याचं दिसत आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओमोध्ये जमीनीला हादरे बसत असल्याचं स्पष्टपणे जाणवलं आहे. मराठवाड्यामध्ये १९९३ साली मोठा भूकंप झाला (Earthquake Video) होता. त्यानंतर आज सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असल्याचं समोर आलं आहे.आज (२१ मार्च रोजी) सकाळी ०६ वाजून ८ मिनीटांनी वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन (Hingoli Earthquake) आली.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर

भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचं केंद्र असल्याचं दिसून आलं आहे. याची खोली १० किलोमीटर असल्याची माहिती मिळत (Earthquake Update) आहे. आज सकाळी मराठवाड्यामध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी ०६ वाजून ८ मिनीटांनी तर दुसरा धक्का ०६ वाजून १९ मिनीटांनी जाणवला. दुसऱ्या धक्क्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल होती.

या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचं दिसून आलं. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याची माहिती मिळत (Parbhani Latur Nanded Hingoli Earthquake) आहे.

मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड व परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT