MAHARASHTRA ATS CRACKDOWN: MULTI-CITY RAIDS, AKOLA SUSPECT DETAINED Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra ATS Raid : भट्टी गँग ATS च्या रडारावर; नाशिक, नागपूरसह ९ जिल्ह्यात छापेमारी, पाकिस्तान कनेक्शन आले समोर

Maharashtra ATS Raid Nashik And Nagpur : महाराष्ट्रात ATS कडून मोठी कारवाई सुरू असून ९ शहरांत एकाच वेळी छापेमारी करण्यात येत आहे. अकोल्यातून एका संशयिताला ताब्यात घेतले असून पाकिस्तानशी संबंधित नेटवर्कचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात ATS कडून मोठ्या प्रमाणावर छापेमारी

  • ९ शहरांत एकाच वेळी ऑपरेशन सुरू

  • अकोल्यातून एक संशयित ताब्यात

  • पाकिस्तान लिंक असलेल्या नेटवर्कचा तपास सुरू

पराग ढोबळे, नागपूर

महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथक (ATS) कडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून राज्यातील विविध जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी करण्यात येत आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित संशयितांवर नजर ठेवत एटीएसने ही मोहीम हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातून एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, आज सकाळी अकोल्यातून त्याला एटीएसने ताब्यात घेतले. राज्यभरात सुरू असलेल्या या ऑपरेशनमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संबंधित संशयितांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

नालासोपारा, नागपूर, पुणे, मुंबई, नांदेड, नाशिक, अकोला, वाशिम आणि जळगाव या ठिकाणी एटीएसकडून एकाच वेळी छापेमारी सुरू आहे. डोग्रा गँगच्या धर्तीवर काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या सर्व कारवाया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडल्या जात असून, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नाशिकमध्येही एटीएसची विशेष हालचाल पाहायला मिळत आहे.

जुने नाशिक परिसरात एटीएस पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. पाकिस्तानी भट्टी गँगशी संबंधित काही संशयित या भागात वास्तव्यास असल्याचा संशय एटीएसला आहे. त्यामुळे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याचवेळी मुंबईतील एटीएसचे पथकही नाशिकमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोठ्या ऑपरेशनमुळे गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कवर मोठा आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरालगत असलेला जुना वाडा कोसळला

Mountain Cycling : तुम्हालाही सायकल ट्रेकिंग आवडते? मग या बेस्ट ५ ठिकाणांना द्या भेट

Solapur : महामार्गावर रक्ताचा सडा, मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, २ मित्रांचा जागीच मृत्यू

चहा सोडून 'हे' 1 डिटॉक्स ड्रिंक्स प्या, पोटावरची चरबी झरझर होईल कमी

PM Kisan Yojana: जून महिना आला तरी शेतकऱ्यांचं खातं रिकामं, कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता?

SCROLL FOR NEXT