RATNAGIRI ATS ACTION: CHIPLUN YOUTH DETAINED OVER SUSPECTED LINKS TO PAKISTAN-BASED GANGSTER SHAHZAD BHATTI Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : कोकणात ATS ची मोठी कारवाई! 'पाकिस्तान कनेक्शन' उघड, ATS च्या धाडीत संशयित तरुण ताब्यात

Ratnagiri ATS Raid News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एटीएसने मोठी कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याच्या संशयावरून सखोल चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र एटीएसने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये धाड

  • ATS ने एका तरुणाला ताब्यात घेतले

  • संबंधित तरुणाचा पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय

  • पुढील तपास सुरु

विनायक वंजारे, रत्नागिरी

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये धाड टाकली आहे. पाकिस्तानात असलेल्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून एटीएसने चिपळूणमधील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयिताचा मोबाईल फोन, त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स याची सखोल तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत पाकिस्तानात असलेल्या गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या काही सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि डिजिटल युजर आयडीद्वारे संपर्क झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, हा तरुण गँगस्टारशी का कॉन्टॅक्टमध्ये होता? तो केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की, त्यामागे गुन्हेगारी किंवा दहशतवादी स्वरूपाचे जाळे काम करत होते, याबाबत अद्याप कोणतेही माहिती समोर आली नसून पोलीस या अनुषंगाने तपास करत आहेत. ही कारवाई शहजाद भट्टी याच्याशी संबंधित डिजिटल नेटवर्क आणि संपर्क साखळीच्या तपासाचा एक भाग आहे. राज्यातील विविध भागांतील अनेक संशयित व्यक्ती एटीएसच्या रडारवर असून त्यांच्या डिजिटल व्यवहारांची, मोबाईल डेटाची तसेच कॉल डिटेल्सची कसून पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. संशयास्पद हालचाली, ऑनलाइन व्यवहारवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता एटीएसच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT