राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरमध्ये सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवत सत्ताधारी बाकावर बसले. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दानवेंच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले.
आजच्या कामकाजात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नवाब मलिकांवरुन देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. "एक सभासद सभागृहात शेवटच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांची काय भूमिका आहे, हे कळायला पाहिजे," असे अंबादास दानवे म्हणाले. दानवेंच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
दानवेंच्या या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले. 'नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांना मंत्रीपदावरुन का काढलं नाही? याचे उत्तर द्या,' मग बोला असे फडणीस यावेळी म्हणाले. तसेच "आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलोय. आमच्या मांडीला मांडी लावून अजित पवार बसलेत.." असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, नवाब मलिक यांच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र भाऊ सरडा आत्महत्या करेल" असा घणाघात त्यांनी केला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.