Maharashtra Assembly Session:  उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांची भेट! शिंदे गट, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांनी राजकारण ढवळून निघालं; पाहा VIDEO
Maharashtra Assembly Monsoon Session 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांची भेट! शिंदे गट, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांनी राजकारण ढवळून निघालं; पाहा VIDEO

Gangappa Pujari

मुंबई, ता. २७ जून २०२४

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस दोन बड्या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चांगलाच गाजला. आधी मंत्री चंद्रकांत पाटील आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीबाबत शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी दिलेल्या बोलक्या प्रतिक्रियांमुळे या नव्या मैत्रीबाबत उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

संजय शिरसाट, अतुल भाळकरांचे महत्वाचे विधान!

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, तसेच अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी पाटलांकडून ठाकरेंच्या नेत्यांचे चॉकलेट भेट देत अन् पेढा भरवून स्वागत करण्यात आले. या भेटीबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

"आमची वैयक्तिक भांडणे नाहीत. राजकीय भांडण वेगळे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मतभेद असावेत मनभेद नाही," असे म्हणत अतिशय चांगली भेट झाल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तसेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये लिफ्टमध्ये झालेली भेट ही योगायोगाने घडली, त्याचे राजकीय अर्थ काढू नका' असे भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले.

"उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे, म्हणजे विषय संपला आहे. योगायोगाने आपल्याकडे पाच-पन्नास लिफ्ट नाहीत त्यामुळे एकाच लिफ्ट मधून ते गेले. याचा अर्थ लगेच एकत्र आले असं नाही," असे म्हणत सुषमा अंधारे यांनीही ठाकरे- फडणवीस भेटीवर महत्वाचे विधान केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli News : हिंगोलीत शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं; तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक

Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

Shiv Stuti : महादेवाच्या अराधनेने दूर होईल आर्थिक संकट; आजपासून पूजेमध्ये करा हे बदल

Marathi Live News Updates: भंडाऱ्यात जोरदार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे ५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

Pooja Hegde: पूजाने दिला रेड अलर्ट!

SCROLL FOR NEXT