rohit patil latest news :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अनोखा योगायोग! आबांच्या एक्झिटदिवशी रोहित पाटलांची शपथ, पहिलंच भाषण जोरदार गाजलं, वाचा

rohit patil latest news : 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटलांची विधानसभेतून ज्या दिवशी एक्झिट झाली त्याच दिवशी त्यांचा मुलगा रोहित पाटील यांची एण्ट्री झाली. आणि एण्ट्रीच्या दिवशीच रोहित पाटलांच्या भाषणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या भाषणानं सर्वांना आर आर पाटलांचीच आठवण करून दिली....त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : 15 व्या विधानसभेत दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहीत पाटील यांनी एण्ट्री केलीय आणि त्याला योगायोग ठरलाय तो म्हणजे आर आर पाटील यांनी उपचारासाठी विधानसभेतून एक्झिट घेतली तो दिवस.... नेमकं याच दिवशी रोहीत पाटलांनी आमदारकीची शपथ घेतलीय.. दरम्यान रोहीत पाटलांच्या एण्ट्री पासून ते त्यांच्या बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आर आर आबांची छाप असल्याची चर्चा रंगलीय. ती नेमकी कशी पाहूयात....

1990 मध्ये आर आर पाटील जेव्हा विधानसभेत आले. त्यावेळी खानापूरचे आमदार अनिल बाबर सोबत होते... नेमकं आता आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील आणि अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांनी सोबतच विधीमंडळाच्या आवारात एण्ट्री केलीय.

एवढंच नाही तर रोहीत पाटलांचा स्वभावही आबांसारखाच मिश्किल असल्याचं विधानसभेत पहायला मिळालं.. त्याचं झालं असं की, रोहित पाटलांनी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत विनोद केला.

आर आर पाटलांसारखंच रोहीत पाटीलही विनोदी असल्याचं दिसून आलं.. आर आर पाटलांनी विधानसभेत केलेल्या अखेरच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते.. त्यावेळी सभागृहात हास्यकल्लोळ सुरु होता.. नेमकं तेच दृश्य रोहीत पाटलांच्या भाषणावेळी दिसलं... यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही हसू आवरू शकले नाहीत..

त्यामुळे पवारांच्या पक्षाने आबांना जशा संधी दिल्या तशाच संधी रोहीत पाटलांनाही द्यायला सुरुवात केलीय.. त्यामुळे आर आर पाटलांसारखीच ऊंच झेप रोहित पाटील घेणार का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

SCROLL FOR NEXT