Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Session : कारखान्यातील स्फोटांचा विधानसभेत आवाज; विरोधकांच्या मागणीला मंत्र्यांचं उत्तर! VIDEO

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: गेल्या सहा महिन्यात घडलेल्या विविध घटना, दुर्घटनांवरुन विरोधक आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरताना दिसत आहेत. आज सभागृहात डोंबिवली एमआयडीसी दुर्घटना तसेच नागपुरात कारखान्यात झालेल्या स्फोटावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले

Gangappa Pujari

सुनिल काळे, ता. २९ जून २०२४

राज्याच्या अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात घडलेल्या विविध घटना, दुर्घटनांवरुन विरोधक आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरताना दिसत आहेत. आज सभागृहात डोंबिवली एमआयडीसी दुर्घटना तसेच नागपुरात कारखान्यात झालेल्या स्फोटावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

डोंबिवली एमआयडीसीमधील भीषण दुर्घटना तसेच नागपुरात कारखान्यात स्फोट झाले त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच या परिसरात असलेल्या कुटुंबांना स्थलांतरीत केल पाहिजे, त्यांना नोकरी दिली पाहिजे आणि याप्रकरणी औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मंत्री सुरेश खाडे यांचे उत्तर!

विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी उत्तर दिले. नागपुर कारखान्यातील स्फोट प्रकरणात बाधितांचे स्थलांतर केलं आहे. त्याचबरोबर त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करु. या कारखान्याला ४५ लोकांचे लायसन्स दिलं आहे. तिथे नेहमी काम नसते, ऑडिट आलं की काम करतात. अशी माहिती देत ५ ते १० लाखांची मदतीचा चेक जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. असे खाडे यांनी सांगितले.

अनिल देशमुख आक्रमक!

दरम्यान, नागपुरमधील कारखान्यात घटना घडल्यानंतर तिथले मॅनेजर आणि मालक पळून गेले. त्याठिकाणी कोणतीही काळजी घेतली नव्हती. या दुर्घटनेत कामगार १०० टक्के भाजले होते. मात्र त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. जखमींना सेन गुप्ता हाॅस्पिटलमधये घेऊन गेले, मात्र पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही, असे सांगितले गेले. असे गंभीर आरोप करत ⁠दादा काल आपण मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र या परिवाराला आपण २५ लाखांची मदत केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT