Tank Accident Ladakh: ब्रेकिंग! नदी पार करताना भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्याचा अपघात, ५ जवान शहीद

Indian Army Tank Accident Ladak News: कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टॅंकला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Tank Accident Ladakh: ब्रेकिंग! भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा नदीत मोठा अपघात, ५ जवान शहीद
Ladakh Tank Accident News: Saamtv
Published On

भारतीय सैन्य दलाच्या टँकला (रणगाडा) मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टॅंकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Tank Accident Ladakh: ब्रेकिंग! भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा नदीत मोठा अपघात, ५ जवान शहीद
Delhi AIIMS Hospital: पहिल्याच पावसात AIIMS मध्ये साचलं पाणी; 9 ऑपरेशन थिएटर बंद, रुग्णाचे हाल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी याठिकाणी युद्ध सराव सुरू होता. यावेळी रणगाडे नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या रणगाड्यांमध्ये अडकून पाच जवान शहीद झाले.

दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. या भागात अभ्यास दौरा सुरू होता. भारतीय सैन्यदलाचे अनेक टँक्स याठिकाणी आले होते. आज नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे रणगाडा अडकला, ज्यामध्ये असलेले पाच जवान शहीद झाले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.

Tank Accident Ladakh: ब्रेकिंग! भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा नदीत मोठा अपघात, ५ जवान शहीद
Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?

दरम्यान, या अपघाताच्या वेळी रणगाड्यामध्ये लष्कराचे पाच जवान उपस्थित होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा T-72 टँक होता.

Tank Accident Ladakh: ब्रेकिंग! भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा नदीत मोठा अपघात, ५ जवान शहीद
VIDEO: 'खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा', अर्थसंकल्पावरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com