केंद्र सरकारने मंगळवारी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी याआधी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ 30 जून 2024 पासून सुरू होणार आहे.
एका निवेदनानुसार, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी पदभार स्वीकारतील, तर विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज सी पांडे त्याच दिवशी निवृत्त होतं आहेत.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर व्यापक ऑपरेशनलचा अनुभव आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांची जागा घेतली होती आणि लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग आहेत, जे दक्षिणी लष्कराचे कमांडर आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी आणि लेफ्टनंट जनरल सिंग हे दोघेही लष्करी अधिकारी वर्गमित्र आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै 1964 रोजी जन्मलेले उपेंद्र द्विवेदी डिसेंबर 1984 मध्ये लष्कराच्या पायदळमध्ये (जम्मू आणि काश्मीर रायफल्स) नियुक्त झाले होते. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या कमांड नियुक्तींमध्ये रेजिमेंट 18 जम्मू आणि काश्मीर रायफल्स, ब्रिगेड (26 सेक्टर आसाम रायफल्स), डीआयजी, आसाम रायफल्स (पूर्व) आणि 9 कॉर्प्सचा समावेश आहे.
उपेंद्र द्विवेदी यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल, रेवा येथे झाले. यानंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी डीएसएससी वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. द्विवेदी यांना युएसएडब्लूसी, Carlisle, यूएसए येथे प्रतिष्ठित एनडीसी समकक्ष अभ्यासक्रमात डिस्टिंग्विश्ड फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एम.फिल, स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्समध्ये दोन पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.