गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी
Maharashtra MVA Seat Sharing : राज्यातील विधानसभा निवडणूक (maharashtra vidhan sabha election 2024) कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, त्यामुळे मविआच्या जागावाटप चर्चेला वेग आलाय. दोन दिवसांत मविआचं जगावाटप पूर्ण होणार असल्याची माहिती, मिळाली आहे. मविआचं जागावाटप २५० जागांवर झाल्याचं समोर आलेय. काही जागांवर पेच कायम आहे, त्याबाबात दोन दिवसात निर्णय होऊ शकतो. (maharashtra assembly election 2024)
महाविकास आघाडीत २४० ते २५० जागांवर एकमत (Mva Seat Sharing Formula for Maharashtra) झालेय. चाळीस ते पन्नास जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे. आज पुन्हा विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा होणार आहे. काही जागांवर तिढा कायम राहिल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तिढा सोडवला जाईल. तर उर्वरित एकमत झालेल्या जागा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray) १०० च्या आसपास तर काँग्रेस पक्ष १०० पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. तिढा पूर्णपणे सुटल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर येईल. (2024 Maharashtra Legislative Assembly election)
महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत, अश्या १५४ जागा त्याच पक्षांकडे ठेवण्यात आल्यात... अगदी काही मोजक्या जागांवर फेरफार करण्यात आला आहे. उर्वरित ८६ च्या आसपास जागांबाबत निर्णय घेत असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते, दुसऱ्या स्थानी असलेला पक्ष, निवडून येण्याची क्षमता असलेला पक्ष आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघानुसार मिळालेली मतं या सगळ्याचा विचार करून जागा वाटप केले जात आहे.
विदर्भातील सुद्धा बहुतेक जागांवर चर्चा पूर्ण झाली असून दहा ते पंधरा जागांवर पुन्हा एकदा आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे . महाराष्ट्रातील विविध विभागातील ज्या जागांवर तिढा आहे अशा ४०-५० जागांमध्ये ज्या जागांचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न बैठकीत होईल. ज्या जागांवर तिढा कायम राहील त्या महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असे समोर आलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.